Google Ad
Editor Choice

महिलांचे कायदेशीर हक्क व अधिकार सामाजिक जनजागृती कार्यक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.16 नोव्हेंबर) : ‘महिलांचे कायदेशीर हक्क व अधिकार ‘ सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन गूगल मिट द्वारे ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद’ व ‘पुणे शहर महिला सबलीकरण ग्रुप’ तर्फे रविवारी दुपारी ०४.०० वा. करण्यात आले आहे.

यामध्ये ऍड. अश्विनी बोगम या महिलांना कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.यामध्ये महिलांची फसवणूक, महिलांचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, महिलांच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह या कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

Google Ad

महिला अत्याचाराला तोंड फोडणे ही सुरुवात असते. त्याच्या बातम्या येतात, गदारोळ होतो पण न्याय मिळणे ही स्वतंत्र पाठपुरावा करण्याची गोष्ट असते. म्हणूनच त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शनाची गरज असते, हे ओळखून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद व पुणे जिल्हा महिला सबलीकरण ग्रुप च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऍड. अश्विनी बोगम यांनी आतापर्यंत पीडितेशी संपर्क करणे, तिला संरक्षण देणे, तिला धीर देणे, कायदेशीर भाषेत पळवाटा राहणार नाहीत असा गुन्हा नोंदवायला लावणे, न्यायालयात जबाब देण्याची तयारी करून घेणे, अशी कामे करून अनेक केस निकालापर्यंत नेल्या आहेत. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराचे समुपदेशन करून आतापर्यंत अनेक जोडप्यांचे समुपदेशनही केले आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 बाबत माहिती मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सूचना : — सदर कार्यक्रम मोफत असून रजिस्ट्रेशन मात्र अनिवार्य आहे. 9766018980 / 7719950098 / 9881100300 यापैकी नंबर वर व्हाट्सअप किंवा एस. एम. एस द्वारे आपली उपस्थिती कन्फर्म करा.

(ऍड. अश्विनी बोगम या कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!