Google Ad
Editor Choice Maharashtra

गुढीपाडवा : गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तूंची खरेदी ठरू शकते शुभ … जाणून घ्या या गोष्टी

महाराष्ट्र 14 न्यूज, (चैत्र शु. १ ) : हिंदू धर्मियांसाठी चैत्र  महिना हा फार खास असतो. चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाच्या प्रतिपदेला दक्षिण भारतात युगादी साजरा केला जातो तर महाराष्ट्र आणि गोव्यात  गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. ही नववर्षाची सुरुवात असते.

असे मानले जाते की चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने  सृष्टीची निर्मिती केली होती आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते ज्यात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा होते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी किंवा नव्या वस्तूंची खरेदी  करण्यासाठी उत्तम मुहूर्त असतो. जाणून घ्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करावी.

Google Ad

🔴गुढीपाडव्याच्या निमित्ताने उपलब्ध असतात अनेक ऑफर्स
या दिवसांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आसपास अनेक गोष्टींवर मोठमोठ्या सवलती आणि ऑफर्स उपलब्ध असतात. जर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असतील किंवा गुंतवणूक करायची असेल तर यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त उत्तम असतो. यादिवशी किंमती धातू, घर, कार्यालय, वाहन किंवा विद्युत उपकरणे खरेदी करणे शुभ असते.

🔴गुढीपाडव्याच्या दिवशी करा घर किंवा कार्यालयाची नोंदणी
आपले स्वतःचे घर किंवा कार्यालय असणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. जर आपण अशी योजना करत असाल तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही खरेदी करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घर, कार्यालय किंवा कारखाना अशा अचल संपत्तीच्या खरेदीची टोकन मनी किंवा नोदणी करू शकता. यासाठी गरजेच्या असलेल्या कर्ज किंवा इतर गोष्टींशी संबंधित कागदपत्रे आधीच तयार करून ठेवा. यादिवशी वाहनांची खरेदी करणेही शुभ असते.

🔴गुढीपाडव्याच्या दिवशी दागिने खरेदी करण्याची आहे परंपरा
सध्या हिरे, सोने आणि चांदीच्या किंमती बऱ्याच खाली आलेल्या आहेत. गुंतवणूक किंवा लग्नासारख्या समारंभांसाठी आपल्याला जर याचे दागिने खरेदी करायचे असतील तर हा दिवस उत्तम आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे.

 

🔴विद्युत उपकरणे खरेदी करण्यासाठी गुढीपाडवा उत्तम
विद्युत उपकरणांच्या खरेदीसाठी लोक अनेकदा चांगल्या मुहूर्ताच्या शोधात असतात. जर आपल्यालाही टीव्ही, फ्रिज, वॉटर फिल्टर, स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही विद्युत उपकरण खरेदी करायचे असेल तर गुढीपाडव्याचा दिवस उत्तम आहे.

सूचना: हा लेख सूचनात्मक उद्देशाने लिहिलेला आहे. या लेखाद्वारे कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!