Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव व सांगवीत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त शेतकऱ्याची कामधेनू गायी आणि वासराचे सामूहिक पूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथे देवकर परिवार ( जिजाऊ डेअरी) व  श्री गजानन महाराज मंदिरासमोर शेतकऱ्याची कामधेनू गायी आणि वासराचे सामूहिक गोमाता पूजन करण्यात आले.

आजपासून दिवाळीला सुरुवात झाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. गाय ही शेतकऱ्याची कामधेनू असल्याने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त तिची यथासांग पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्व असल्याने गाय आणि वासराचे पूजन करून वसुबारस साजरा केला जातो. त्यानुसार जुनी सांगवी येथील सक्सेस ग्रुप आणि सुनेत्रा महिला प्रतिष्ठानच्या सौ. मंदाकिनी तनपुरे व दिलीप तनपुरे यांच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरासमोर व पिंपळे गुरव येथे लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या चंद्ररंग गोशाळेत तसेच देवकर परिवाराच्या वतीने वसुबारसनिमित्त सामूहिक गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी गाय आणि वासराचे परिसरातील महिलांनी पूजन करून वसुबारस सण साजरा केला. यावेळी पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच परिसरातील महिला भगिनी, नागरीक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Google Ad

दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!