Google Ad
Uncategorized

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरात १०० हून अधिक नमो संवाद सभा घेण्याचे सत्र सूरू केले आहे. या सभांना पिंपरी-चिंचवडकरांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांचा विजय साकारण्यासाठी बुथ स्तरावर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासोबतच पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून नमो संवाद सभांचा धडाका सुरू आहे.

मोदी सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी सांगताना राममंदिर, मेट्रो, महामार्ग, डिजिटल इंडिया, कल्याणकारी योजना आणि विकसित भारताचा संकल्प अशा विविध विकासात्मक विषयांवर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात २० नमो संवाद सभा घेऊन जवळपास ५० हजार मतदारांशी संवाद साधला. या सभांमध्ये मतदारांची मतेही जाणून घेण्यात येत आहेत. मावळ लोकसभेसाठी श्रीरंग आप्पा बारणे आणि शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर १०० हून अधिक नमो संवाद सभा महायुतीच्या सभा म्हणून शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत.

Google Ad

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने पक्ष पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात शहराध्यक्ष शंकर जगताप हे सातत्याने जनसंपर्क ठेवत आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांत शंकर जगताप यांनी स्वतः चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये दररोज किमान ४ ते ५ नमो संवाद बैठका घेण्याचा धडाका लावला आहे.  वाकड, कावेरीनगरपिंपळेनिलखविशालनगरकाळभोरनगरशिवनगरीबिजलीनगरपिंपळेगुरववळकरनगरसह पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये नमो संवाद सभा पार पडल्या आहेत. या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता महायुतीच्या एकत्रित सभा घेण्यात येणार असून, याकरिता नियोजन करण्यात आल्याचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले आहे.

वाकड, कावेरीनगरमध्ये नमो संवाद सभा…

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी वाकड, कावेरीनगर व्यायामशाळा येथे नमो संवाद सभा घेण्यात आली.

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी 10 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षांतच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार असून याचा फायदा देशातील दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित सर्वांना होणार आहे. म्हणूनच मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या रूपाने मोदीजींच्या झोळीत मतांचे दान टाकून प्रचंड मतांनी विजयी करा, असे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आवाहन केले.

यावेळी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, स्थायी समिती माजी सभापती ममता गायकवाड, माजी स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य संकेत चोंधे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष पियुषा पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ शहरसंयोजक प्रीती कामतीकर आदी उपस्थित होते.

पिंपळेनिलख, विशालनगरमध्ये नमो संवाद सभा…

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपळेनिलख, विशालनगर येथील गणेश मंदिरात नमो संवाद सभा घेण्यात आली. या सभेला चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेविका आरती चोंधे, माजी स्वीकृत नगरसेवक  बिभीषण चौधरी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य संकेत चोंधे, मंडल अध्यक्ष  प्रसाद कस्पटे, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष पियुषा पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ शहरसंयोजक प्रीती कामठेकर यांच्यासह शक्ति केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पेज प्रमुख यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

काळभोरनगरमधील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काळभोरनगर येथे नमो संवाद सभा घेण्यात आली. या सभेला महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक स्थिर आणि प्रामाणिक सरकार देशाच्या विकासासाठी काय करु शकते हे गेल्या १० वर्षात देशातील जनतेने पाहिले आहे. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. १० वर्षापूर्वी मतदारांनी केलेल्या अचूक मतदानामुळे देशात मोठी कामे झाली आहेत. भाजपा सरकारच्या काळात गरीबांना मोफत रेशन मिळाले. कायमस्वरूपी घरे मिळाली. देशातील जनतेने २०१४ मध्ये नरेंद्रजी मोदी यांना सेवा करण्याची संधी दिली. त्यांनी या संधीचे देशवासीयांसाठी सोने करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी मतदारांनी तिसऱ्यांदा महायुतीच्या पारड्यात मत टाकावे, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. यावेळी आमदार उमाताई खापरे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, शहर उपाध्यक्ष राजूभाऊ दुर्गे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, गणेश लंगोटे, तेजस्विनी दुर्गे, मनिषा शिंदे, मनसेचे विष्णू चावरिया, मेहुल दोशी आदी उपस्थित होते.

शिवनगरी, बिजलीनगरमध्येही बारणे यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार…

महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रावेत-काळेवाडी मंडलांतर्गत शिवनगरी, बिजलीनगर येथे नमो संवाद सभा घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या नमो संवाद सभेला उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. भर उन्हात झालेल्या या नमो संवाद सभेला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला. लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या (एनडीए) सरकारने विकसित भारताचा पाया रचला आहे. २०१४ पूर्वी भारताकडे कमकुवत देश म्हणून पाहिले जात होते. देशात रोज फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या बातम्या झळकत होत्या. देशाची अर्थव्यवस्था कधीही कोलमडू शकते, असे म्हटले जायचे. मात्र २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत मोदीजींनी भारताला संपूर्ण जगासमोर एक शक्ती म्हणून उदयास आणले आहे. अंतराळ क्षेत्रात भारताला पुढे नेले आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी भाजपाचे सरचिटणीस नामदेव ढाके, माजी स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, ओबीसी मोर्चा सरचिटणीस दत्तात्रय ढगे, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष पल्लवीताई वाल्हेकर यांच्यासह सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपळेगुरव, जवळकर नगर महालक्ष्मी मंगल कार्यालयात नागरिकांशी संवाद

पिंपळेगुरव, जवळकर नगर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात नमो संवाद सभा घेण्यात आली. विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या पारड्यात मतदारांनी मोठ्या संख्येने मतांचे दान टाकावे, असे आवाहन शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. यावेळी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष पांडुरंग कोरके, मंडलाध्यक्ष संदीप नखाते, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष शोभाताई जांभुळकर, प्रभाग अध्यक्ष दीपक काशीद, कावेरीताई जगताप, संजय जगताप, रमेश काशीद, गणेश काशीद, नरेश जगताप, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. खडसे काका यांच्यासह सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपळेगुरव येथे श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देण्याचे आवाहन….

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात झालेला विकास हा केवळ ट्रेलर आहे, देशाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमचे प्रत्येक स्वप्न हा मोदींचा संकल्प आहे. मा. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन पिंपळेगुरव, रामकृष्ण मंगल कार्यालयात नमो संवाद सभेत नागरिकांना करण्यात आले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात नमो संवाद सभा घेण्यात आली. यावेळी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, मंडलाध्यक्ष संदीप नखाते, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष पांडुरंग कोरके, मंडल महिला मोर्चा अध्यक्ष शोभाताई जांभुळकर, प्रभाग अध्यक्ष दीपक काशीद, कावेरीताई जगताप, संजय जगताप, रमेश काशीद, गणेश काशीद, नरेश जगताप आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!