Google Ad
Editor Choice

टॅक्टिकल मूव्ह्स चेस अकॅडमी तर्फे चिंचवडे लॉन्स, चिंचवड, पुणे येथे पहिल्या TMCA ओपन फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे … FI प्रतिक मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ नोव्हेंबर) : टॅक्टिकल मूव्ह्स चेस अकॅडमी तर्फे चिंचवडे लॉन्स, आदित्य बिर्ला हॉस्पिटलजवळ, चिंचवड, पुणे येथे पहिल्या TMCA ओपन फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे स्पर्धा संचालक आणि संयोजक श्री. FI प्रतिक मुळे व त्यांना पाठिंबा देणार्‍या मध्यस्थ आणि स्वयंसेवकांच्या टीममध्ये चीफ ऑर्बिटर IA नितीन शेणवी सर, डेप्युटी चीफ ऑर्बिटर, FA अथर्व गोडबोले, FA मिलिंद नाईक, SNA सारिका साबळे, श्रीमती कुलकर्णी, श्री नितीन उंडाळे, श्री आदेश इंगळे, श्रीपाद जोशी, आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव मुळे, श्रीमती संजीवनी मुळे, श्री किरण शर्मा, श्रीमती स्नेहल शर्मा, श्री कृष्ण शर्मा, श्री राजेंद्र शर्मा आदींनी परिश्रम घेतले.

Google Ad

या स्पर्धेत अव्वल मानांकन रेल्वेचे IM विक्रमादित्य कुलकर्णी (ELO रेटिंग 2310), द्वितीय मानांकन श्री अर्पण दास याला पश्चिम बंगाल (ELO रेटिंग 2102) व तृतीय मानांकन श्री श्रयन मजुमदार, महाराष्ट्र (ELO रेटिंग 1799) आहे. या स्पर्धेत एकूण 121 मानांकित खेळाडूंनी भाग घेतला. गुणांकीत खेळाडूंच्या गुणांकनाची सरासरी 1301 आहे. तसेच एकूण 222 खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडू महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि बेट, मध्य प्रदेश, ओडिसा, गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि यू.एस.ए. चे प्रतिनिधित्व करतात.

स्पर्धेचे उद्घ़ाटन प्रमुख पाहुणे श्री निरंजन गोडबोले (मानद सचिव, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना) यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर त्यांच्यासमवेत आयोजक FI प्रतिक मुळे, IA नितीन शेणवी, IM विक्रमादित्य कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले. श्री निरंजन गोडबोले आणि IM विक्रमादित्य कुलकर्णी यांनी बुद्धिबळाच्या परंपरेनुसार बुद्धिबळ पटावर उद्घ़ाटनची खेळी खेळली. यावेळी श्री नितीन शेणवी मुख्य परीक्षक FA अथर्व गोडबोले, FA मिलिंद नाईक, SNA सारिका साबळे, श्रीमती गायत्री कुलकर्णी, श्री नितीन उंडाळे आदि उपस्थित होते.
नियोजित वेळेत पहिली फेरी सुरू झाली. पहिल्या फेरीतच 8व्या मानांकित श्री प्रिन्स जैस्वालने महाराष्ट्राच्या परम जालानसोबत सामना बरोबरीने सोडविला, तर 75 व्या बोर्डावर महाराष्ट्राच्या बिगर मानांकित निधी पुजारीने तामिळनाडूच्या सुब्रमण्यम टी व्ही विरुद्ध विजय मिळवला. पहिल्या फेरीअखेर एकूण 105 अव्वल मानांकित खेळाडूंनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर खात्रीपूर्वक विजय मिळवला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!