Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मध्ये कसा असेल कंटेन्मेंट झोन? आयुक्तांनी केल्या नवीन सूचना!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन मध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरात सोसायटी तसेच ग्रामीण भागात राहणारे नागरिक यांची आपल्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला की वेगवेगळ्या मागण्या असत, यामध्ये औषध फवारणी करणे तो भाग कंटेन्मेंट म्हणून सील करणे किंवा काही नागरिक फक्त तेवढा भागच किंवा इमारत सील करा अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत.

या गोष्टीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील हौसिंग सोसायट्याना सूचना केली आहे की पाच पर्यन्त रुग्ण असलेल्या सोसायट्या कंटेन्मेंट म्हणून जाहीर केल्या जाणार नाहीत, तर फक्त तिथे औषध फवारणी करून रुग्ण असल्याचा फलक नागरिकांच्या माहिती करीता लावला जाईल.

Google Ad

पाच रुग्ण ज्या भागात सापडतील तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला जाईल व त्या भागात सर्व नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल तसेच त्या भागातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व त्या भागात कोणालाही येता येणार नाही. तसेच त्या भागातील कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतः खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचेही आयुक्तांनी सूचित केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!