Google Ad
Uncategorized

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा (अ.जा.) कार्यालयाच्या वतीने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक क्षेत्रीय अधिकारी वर्गास आज ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
  निगडी प्राधिकरण येथील हेडगेवार भवना मधील सभागृहामध्ये मुख्य प्रशिक्षक गोरखनाथ घोलप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ५२ निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण दिले
 यावेळी निवडणूक प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी जावळे, सदेंश खडतरे,तसेच मिडीया सेलचे  नोडल अधिकारी विजय भोजने उपस्थित होते.
 पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्र ४०० मतदान केंद्र असून त्यासाठी ५२ निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या दोन सत्रात झालेल्या प्रशिक्षणामध्ये एका ईव्हीएम वर दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!