Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त ‘राजेश आगळे’ यांच्या डोक्यावर कोणाचा हात?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जुलै) : पिंपरी चिंचवड महापालिकेत शिस्त यावी शहराचा नावलौकिक वाढवा म्हणून राजेश पाटील यांची एक कार्यकुशल अधिकारी, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची जबाबदारी देण्यात आली. परंतु म्हणावा तसा दबदबा त्यांना मिळवण्यात यश आलेले दिसत नाही. अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

कारण ही तसेच आहे, क्लार्क पासून ते सहाय्यक आयुक्त पदापर्यंत २२ वर्ष एकाच ठिकाणी मजल मारणारे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांची प्रशासनातील मक्तेदारी आयुक्त राजेश पाटील मोडून काढणार का?… असा सवाल आहे. कारण सहाय्यक आयुक्त राजेश आगळे हे प्रशासनात गेल्या २२ वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत, अनेक आयुक्त आले आणि गेले परंतु कोणीही त्यांची बदली करू शकले नाहीत, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे, हे ही गुलदस्त्यात आहे?…

Google Ad

याच महिन्यात महापालिका आयुक्त राजेश पाटील अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना बदलीचा धडाका लावला आहे. मात्र त्याची नजर २२ वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या राजेश आगळे त्यांच्या वरती पडलेली दिसत नाही? या ठिकाणी बदली होण्यासाठी अनेकजण गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, परंतु जाणीवपूर्वक या बदलीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे अशी चर्चा सर्व अधिकाऱ्यांमध्ये रंगलेली आहे.

महानगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत महाराष्ट्र शासनाचे धोरण व नियम अक्षरशः पायदळी तुडविले जाताना दिसत आहेत. तसेच अनेक अभियंता विभागात अनेक कनिष्ठ आभियंता हे सुद्धा पालिकेत अनेक वर्ष ठाण मांडून लाखो रूपयाचा मलिदा लाटताना दिसतात तीन दिवसापूर्वी काही कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्या केल्या आहेत मात्र अजूनही बरेच उपअभियंता, कनिष्ठ अभियंता एकाच ठिकाणी दिसतात त्यामुळे अनेक अधिकारी म्हणतात की आयुक्ताना फक्त आम्हीच दिसतो का? अशी चर्चा पालिका परिसरात अधिकारी चवीने करताना आढळून येतात. त्यामुळे आता अधिकारी कर्मचाऱ्यांना आयुक्त काय शिस्त लावतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या बाबत आम्ही प्रशासन विभागात संपर्क साधला असता राजेंश आगळे यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!