Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका ‘माधवीताई राजापुरे’ यांच्या वतीने प्रभाग क्रं.३१ पिंपळे गुरव-नवी सांगवी मधील आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट चे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४जुलै) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करता समाजातील विविध घटकांसाठी सेवाकार्यात योगदान द्यावं, असं आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत, तसेच शंकरराव राजापुरे यांच्या ९५ वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्र. ३१ च्या नगरसेविका माधवीताई राजापुरे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांनी प्रभागात विधायक उपक्रम हाती घेतला.

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव-नवी सांगवी हा प्रभाग कचरा कुंडी विरहित करण्याकरीता ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ऊन वारा, पावसाची तमा न बाळगता मेहनतीने काम केले अशा प्रभागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना पावसापासून बचाव होण्यासाठी रेनकोटचे वाटप पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे , माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

Google Ad

यावेळी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, कोरोनाच्या संकटात आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत या कर्मचाऱ्यांनी आपला प्रभाग कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष दिले. महानगरपालिकेने इंदूर शहराच्या धर्तीवर कचऱ्याची समस्या कशी दूर करता येईल असे धोरण आखले आहे, या सर्व गोष्टी करताना हा कर्मचारी यातील महत्वाचा दुवा असणार आहे, आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आज माधवीताई राजापुरे यांनी योग्य रित्या पार पाडली आहे.

या कार्यक्रमात बोलताना माजी ‘नगरसेवक शंकरशेठ जगताप’ म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक३१ पिंपळे गुरव-नवी सांगवी हा शहरातील रोल मॉडेल ठरावा… असे कचराकुंडी विरहित प्रभाग करण्याचे काम संपूर्ण शहरात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून सर्व नगरसेवक करत आहेत. याची सुरुवात या प्रभागापासून झाली, याचा आदर्श शहरातील सर्व प्रभागाने घ्यावा. तसेच आपला प्रभाग हा डेंगू विरहित व्हावा यासाठीही प्रयत्न करावेत, तसेच सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांचा हेल्थ इन्शुरन्स काढून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी अशी विनंतीही महापौर माई ढोरे यांना केली.

यावेळी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, भाऊसाहेब जाधव, सुरेश शिंदे, चंद्रकांत बेंडे, श्यामराव धस, पत्रकार संतोष महामुनी, बाबासाहेब बर्गे,बाजीराव मागाडे, लोकमत पत्रकार मासाळ, महेंद्र राजापुरे, रोहित काकडे, शैलेश जाधव महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य सहाय्यक दशरथ बांबळे , आरोग्य मुकादम विकास कांबळे , कविता गोहेर , आरोग्य कर्मचारी सिद्धार्थ जगताप , कुणाल कांबळे , रामदास मोझे , गणेश भंडारी , मारुती देवकुळे , आनंदा फंड , विनोद कांबळे , दिलीप नाईकनवरे , प्रमोद ढमाळ आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!