Google Ad
Editor Choice

पवना नदीत वाहत आलेल्या मृतदेहाची दोन तास हेळसांड … पिंपरी चिंचवड मनपाच्या अग्निशामक विभागाचा गलथान कारभार उघड!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जून) : मंगळवार (दि.२२जून २०२१) रोजी दुपारी पवना नदीमधून एक मृत्तदेह वाहत येऊन सकाळी सांगवी स्मशाभुमी येथे आला होता. एका नागरिकाचा सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे यांना फोन आला की या मृतदेहाची सकाळपासून कोणीही तक्रार केली नाही.आत्ता दुपारी १:०० वाजला आहे मृत्तदेह पाण्यावर तरंगत आहे. राजू सावळे यांना कळताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी व कार्यकर्त्यांनी सांगवी पोलीस स्टेशनचे रघुनाथ उंडे (वरिष्ठ पोलीस निरिक्षक) व रोहिदास बोऱ्हाडे यांना कळवले त्यानंतर काही वेळातच हेमा सांळुके (उपनिरीक्षक) व चार पोलीस त्या ठिकाणी आले. तसेच पिंपरी चिंचवड मनपा अग्णिशामक दलासही कळवले १० मिनटातच सर्व यंत्रण हजर झाली.

पण मनपा अग्णिशामक दलाचा गलथान कारभार पाहायला मिळाला नदीच्या कडेला हाताला लागत असणारा मृतदेह काढायला दोन तास लावले. कारण काय तर हातमोजे नाहीत,स्ट्रेचर नाही, मृतदेह काढण्यासाठी चादर नाही इत्यादी करणे सांगितली पोलीस यंत्रण देखिल पंचनामा करण्यासाठी दोन तास खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी काही हरवलेल्या (मिसिंग) झालेल्याच्या तक्रार नातेवाईकांना बोलावले व ओळख पटती का याबाबत शहानिशा केली नातेवाईकांनी आपलीच व्यक्ती आहे असे सांगितले व त्यांनंतर अग्निशामक दलाने त्यांनाच (नातेवाईकानांच) मेडिकलमधून हातमोजे व इतर गोष्टी आनण्यासाठी सांगितले व नंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर ॲब्युलन्स बोलावली व औंध जिल्हा रूग्णालय येथे पाठवले. असा आहे कारभार….

Google Ad

पिंपरी चिंचवड मनपा कररूपी पैसे घेते, मग यंत्रणा त्यांच्याकडे नाहीत का ? महानगरपालिकेकडे पैसे नाहीत का ? मनपाचा अंधाधुंदी कारभार यावर नक्कीच संमधित विभागाला विचारणाकरून यंत्रण सक्षम करण्याची मागणी करणार आहोत . असे यावेळी राजू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!