Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ तथा महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी – चिंचवड तर्फे स्वर्गरोहन शिडी लोकार्पण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जून) : आज बुधवार दिनांक २३ जून रोजी पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ तथा महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी-चिंचवड तर्फे स्वर्गरोहन शिडी लोकार्पण कार्यक्रम पार पडला.
एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर बांबूची शिडी बांधण्याकरीता अनुभवी व्यक्तीची गरज लागते.

परंतू कोरोना काळात वरीष्ठ व अनुभवी व्यक्तीना अंत्ययात्रेत सहभागी होता येत नाही. हे लक्षात घेऊन पुणे जिल्हा प्रगती मंडळ तथा महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी-चिंचवड यांनी स्वर्गारोहण शिडीचा प्रकल्प मुरलीधर सारडा ह्यांच्या मार्गदर्शना खाली राबवत आहे. सदर शिडी स्टीलची असून फोल्डीग करता येते. तसेच टूव्हीलरवरही सहज आणता येते.

Google Ad

सदर लोकार्पण कायर्क्रम प्रगतशील, उद्योजक, शेतकरी माननीय विजयशेठ पांडुरंग जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळे गुरव येथे पार पडला. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष रुतिश लोहिया, मंडळाचे सभासद गिरिधारीजी राठी, डॉ. शाम चांडक, मधुसूदनजी राठी, मंगेश दिवाण गुरुजी, सत्यनारायणजी राठी, चंद्रकांतजी मुंदडा, छगनलालजी चांडक, आदी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमप्रसंगी मनाचे श्लोक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

▶️सदर स्वर्गरोहन शिडी २४ ठिकाणी उपलब्ध आहे.

अधिक माहितीकरिता संपर्क :

श्री.मुरलीधरजी सारडा – ९६८९९०३७४६
श्री. अजयजी लठ्ठा – ९४२२१६१३८१
श्री. गिरिधारीजी राठी – ९९६०१७८१७८

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!