Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : … त्या आमदारांना विधिमंडळात प्रवेशबंदी

महाराष्ट्र 14 न्यूज : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबरला पार पडणार आहे . दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे . कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही . सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून पावसाळी अधिवेशन होणार आहे . शोक प्रस्ताव , अतारांकित प्रश्न , पुरवणी मागण्या , विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे . सात शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा यात समावेश आहे .

सुरक्षेविषयी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत . अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड -19 साठीची ‘ आरटीपीसीआर ‘ तपासणी करण्यात येईल , असा निर्णय घेण्यात आला . कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल . सहव्याधी ( कोमॉर्बिडीटी ) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही आमदारांची बैठक व्यवस्था होणार आहे . प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट देण्यात येणार आहे . किटमध्ये फेस शील्ड , मास्क , हॅण्ड ग्लोव्हज , सॅनिटायझर या वस्तूंचा समावेश असेल . आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही . स्वीय सहायक , वाहनचालकांची बैठक व्यवस्था तंबूत केली जाणार आहे .

Google Ad

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या . विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर , तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील , गिरीष महाजन , अॅड . आशिष शेलार , अमिन पटेल , सुनील प्रभू , विधान परिषद सदस्य डॉ . रणजीत पाटील , अशोक ऊर्फ भाई जगताप , विजय ऊर्फ भाई गिरकर , जयंत पाटील , कपिल पाटील उपस्थित होते .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!