Google Ad
Uncategorized

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेत पवार बोलत होते. बारामती लोकसभा निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे, कारण बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगत आहे. बारामतीच्या या लढाईत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष आहे, पण काही ठिकाणी कार्यकर्ते दोन्ही ठिकाणी दिसत असल्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.

जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही”. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध मी पदे दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत. कुंकू लावायचा असेल तर एकाचेच लावा. माझे तरी लावा नाहीतर त्यांचे तरी लावा, हा काय चाटाळपणा लावलाय?’ असा संतप्त सवाल अजितदादांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे.

Google Ad

‘हे झाकून राहत नाही, मला कळतं जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा मला कळले होते, पण जुने पुराणे उकळून काढायचे नाही, असं मी ठरवलं आहे, असं अजित पवार म्हणाले. उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागलेत, पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय, अशा स्वरूपात अजितदादांनी अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना टोला मारलाय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!