Google Ad
Editor Choice Pune

पुण्यात शनिवार आणि रविवारी वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं घेतला हा निर्णय … महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जून) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातही कोरोना संसर्गाचा धोका कमी झालाय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र, शिथिलता मिळाल्यानंतर पुणेकर मार्केट आणि दुकानांमध्ये मोठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मॉल, दुकानं आणि सलून बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

पुण्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं बंद राहणार आहेत. वाढत्या गर्दीमुळं पालिकेनं हा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी आणि रविवारीही हा नियम लागू असणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Google Ad

पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा देता येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!