Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काळेवाडी रहाटणी प्रभाग … राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष पदी कु . पुजा काळे यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जून) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी काळेवाडी प्रभाग क्र.२२ प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष पदी कू . पुजा आत्माराम काळे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर व सौ. वैशाली जलिंधर काळभोर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

सिझन हॉल दुर्गा चौक निगडी येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी सौ. वैशाली काळभोर – महिला अध्यक्ष पिं.चिं. रा. काँग्रेस, आणि नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. काळेवाडी रहाटणी भागातील सामाजिक कार्याची दखल घेत, कू. पुजा आत्माराम काळे यांना प्रभाग उपअध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

Google Ad

या निवडीच्या वेळी बोलताना पुजा ताई म्हणाल्या ” काळेवाडी रहाटणी येथील महिलांना सक्षमीकरणासाठी आपण चांगल्या प्रकारे सहकार्य करु व कोरोनाच्या संकट काळात महिलांना बचत गटामार्फत कसा रोजगार मिळेल यासाठी आपण आग्रही भूमिका घेऊन तो मिळवुन देण्यास प्रयत्नशिल राहू, तसेच मला दिलेल्या संधीचा उपयोग मी तळागाळातील गोरगरिबांना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी काम करेल असे कु. पुजा काळे यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!