Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सामाजिक कार्यकर्ते ‘राजेंद्र पाटील’ यांच्या धमकीच्या फोनची पोलीस प्रशासनाने नाही घेतली दखल … सर्वसामान्यांना न्याय देणार तरी कोण ?

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच सदस्य –संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासनाचे सदस्य राजेंद्र उत्तम पाटील यांना १२ ऑक्टोबर २०२० तोजी एका अज्ञात व्यक्तीने निनावी फोन करून अशील भाषेत शिविगाळ करून दमदाटी केली. राजेंद्र पाटील हे सांगवी पोलिस ठाण्याच्या शांतता कमिटीचे सदस्यही आहेत, त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात दि १२ ऑक्टोबर २०२० रोजी तक्रारही दिली आहे.

राजेंद्र पाटील यांना निनावी मोबाईल नंबरवरून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकीच्या फोन आल्यानंतर त्यांनी लगेचच सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली व सविस्तर आलेल्या धमकीची माहिती व ज्या फोन नंबरवरून फोन आला तो नंबर सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याना दिली. त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश दिले. परंतु आज दोन महिने होत आले तरी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास लागला नाही, आणि त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही.

Google Ad

याच काळात मनसे च्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार सौं रुपालीताई ठोंबरे पाटील यांनाही धमकीच्या फोन आला होता. त्यांनीही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आणि सदर व्यक्तीला दुसऱ्याच दिवशी शोधून अटक करण्यात आली. त्याचबरोबर आज मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनाही अश्लील शिवीगाळ व धमकीच्या फोन आला त्या व्यक्तीला लगेच गुजरात येथून अटक करण्यात आली. अशी तत्परता सामान्य नागरिकांच्या बाबतीत पोलिस प्रशासनाकडून का होत नाही असा प्रश्न राजेंद्र पाटील यांनी केला आहे .

एक सर्वसामान्य व्यक्तीला समाजात सामाजिक कार्य करताना असा धमकीचा फोन येऊन दोन महिने उलटले तरी त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या अद्याप तपास लागला नाही. ही पिंपरी चिंचवड शहराला कार्यक्षम पोलिस आयुक्त असतानाही साधी दखल घेतली जात नाही ही शहराच्या दृष्टीने ही एक शोकांतिका आहे. खरं तर आशा सामान्य नागरिकाने न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आहे, आणि प्रशासन कोणासाठी आहे हेच कळत नाही, आशेची तक्रारदार राजेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

85 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!