Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : धमकीनंतर किशोरी पेडणेकरांचा थेट विश्वास नांगरे-पाटलांना फोन … २४ तासांच्या आत ‘तो’ आरोपी गुजरात मधून ताब्यात!

महाराष्ट्र 14 न्यूज : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती.  किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. 22 डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती. 31 डिसेंबर 2020 रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक. 261 / 2020 अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

महापौर पेडणेकर  यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांना अखेर ताब्यात घेतलंय. गुजरात जामनगरमधून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, मुंबई पोलिसांचे पथक उद्या त्याला मुंबईत घेऊन येणार आहे. गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नावं मनोज दोढिया असून, तो 20 वर्षांचा आहे. हे कृत्य का केलं, याचा तपास मुंबई पोलीस लावत आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरात जामनगरमधून त्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिसांकडून चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला अटक केली जाणार आहे.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडालीय. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनगरमधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. आपण लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात फोन करून तक्रार दिल्याची माहिती पेडणेकरांनी दिली होती. अखेर 24 तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय.
“फोन करणारा मी जामनगरमधून बोलतोय, असं सतत बोलत होता. तीन-चार फोन आले, म्हणून मी उचलले. मी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन उचलल्यावर त्याने घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली. अश्लील शिव्या दिल्या. जर पोलिसांना सांगितलंत, तर मारुन टाकेन, असं म्हणाला होता. मी लगेच विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी दखल घेऊन लगेच पत्राद्वारे सगळी माहिती घेतली” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

85 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!