Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर स्टेशनच्या कामाने घेतला वेग… आतापर्यंत ९६ % काम झाले पूर्ण!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मध्ये पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४५ % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. तर पिंपरीमधल्या संत तुकाराम नगर इथल्या स्टेशनचं ९६ टक्के काम पूर्ण झालंय. लवकरच या स्टेशनचे सेफ्टी ऑडिट होणार आहे.

संत तुकाराम नगर स्टेशनच्या सेफ्टी ऑडिटसाठी दोन महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना पिंपरी ते फुगेवाडी हा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. पुणे मेट्रोच्या वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. नववर्षात ३ जानेवारीला बरोबर एक वर्षांनी ही दुसरी चाचणी घेण्यात आली.  दुसऱ्या चाचणीसाठी पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!