Google Ad
Editor Choice

राष्ट्रवादी पक्ष ओबीसी समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध ; आमदार अण्णा बनसोडे

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १७ सप्टेंबर) : ओबीसी चे (OBC) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संदर्भात आ अण्णा बनसोडे यांची  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी OBC सेल (पिंपरी चिंचवड शहर ) सोबत बैठक झाली,  यावेळी 15 सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 50% च्या अधिन राहून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भातला अध्यादेश काढणार असल्याचं कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केलं या बद्दल सरकार चे अभिनंदन व विषयाचा पाठपुरावा केल्या बद्दल आ. बनसोडे यांचे आभार मानले , तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आरक्षणाच्या प्रमाणात  OBC उमेदवार द्यावेत अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी  सेल कडून करण्यात आली.

यावेळी बोलतांना  आमदार बनसोडे म्हणाले की OBC समाजाच्या पाठीशी पक्ष व आमदार म्हणून खंबीर पणे उभा राहणार, तसेच OBC आरक्षण संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते ना छगन भुजबळ साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना भेटून OBC समाजाच्या मागण्याचा पाठपुरावा करणार. आपण सर्वानी मिळून केंद्राकडून एम्पिरिकल डाटा मिळण्यासाठी प्रयत्न करू या .  ओबीसी समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन ही आ. बनसोडे यांनी दिले .

Google Ad

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी  ओबीसी सेल पिंपरी  चिंचवड चे अध्यक्ष   विजय लोखंडे , महिला शहर अध्यक्ष सारिकाताई पवार, निरीक्षक सचिन औटे, किरण आंधळकर, पिंपरी विभाग अध्यक्ष ईश्वर कुदळे, भोसरी विभाग अध्यक्ष मनोज सुतार, उपाध्यक्ष पि.के.महाजन, माधवी सोनार , महिला संघटिका कविता खराडे व महेंद्र पवार हे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!