Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागाअंतर्गत ७ व्या दिवशी … २ हजार ५७१ गणेश मूर्तींचे संकलन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ सप्टेंबर २०२१) : गणेशोत्सवाच्या ७ व्या दिवशी शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळून एकूण १५ हजार ११७ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३१,नवी सांगवी-पिंपळे गुरव मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती संकलनात सहभाग घेतल्याचे यावेळी दिसून आले. चौका चौकात ठेवण्यात आलेल्या मूर्ती संकलन रथात (वाहनात) नागरिकांकडून आपल्या मूर्ती विधिवत पूजन करून संकलित करण्यात आल्या, नागरीकांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे स्थापत्य विभागाचे अभियंता ‘विजय कांबळे’ यांनी सांगितले.

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या ७ व्या दिवशी अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ९२२, ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये ४ हजार ४२२, क क्षेत्रीय कार्यालयामध्ये १ हजार ७७०, ड क्षेत्रीय कार्यालयामध्ये १ हजार ५६०, इ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ९६३, फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ८३७, ग क्षेत्रीय कार्यालयामध्ये २ हजार ७२, ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये २ हजार ५७१ श्री गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले.

संकलित करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे महानगरपालिकेच्या वतीने विविध खाणींमध्ये विधीवत विसर्जन करण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!