Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

मैत्रिणीस लग्न कर म्हणून मुलाने कॅफे मध्ये तिच्याशी केली झटापट … घरच्यांना शिविगाळ अन, दिली धमकी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१२ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिस ठाण्यात एका मुलीने तिला तिचा पूर्वीचा मित्र आरोपी अक्षय संजय मुरकुटे, रा. औंध बाणेर,पुणे हा वारंवार त्रास देत असल्याची फिर्याद (१२ एप्रिल) दिलीआहे.

मुलगी आणि तिचा मित्र हे दोघे सांगवीतील  कॅफे मध्ये ११ एप्रिल रोजी कॉफी पिण्यासाठी बसले असता फिर्यादीचा पुर्वीचा मित्र यातील आरोपी संजय हा तेथे येवुन फिर्यादीस म्हणाला की , तु माझ्याशी लग्न कर यापुर्वी तु माझी सांगवी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, त्यामुळे माझ्या घरच्यांची व माझी तु इज्जत घालवली आहे . माझे घरचे लग्न करायला तयार आहे माझी आई खुप आजारी असती तु तिला समजुन घेवु शकती असे म्हणुन त्यांने फिर्यादीचा हात धरुन अंगाला झटापटी केली.

Google Ad

संजय ने तिला ओढत कॅफे बाहेर घेवुन कपडे ओढुन मोबाईल फेकुन फिर्यादीला जबरदस्तीने गाडीवर बसवुन तिच्या रहाते घराजवळील गल्ली मध्ये मधोमध गाडी थांबवुन रात्रौ ० ९ .४० वा . चे दरम्यान फिर्यादीचे आडनाव घेवुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. …. …. बाहेर या असे म्हणुन जोरात ओरडुन शिवीगाळ करुन फिर्यादीच्या घरातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली . अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!