Google Ad
Editor Choice

सिल्व्हर ओक’वर हल्ल्याचा कट कसा रचला गेला? ‘संभाषण ‘न्यूज वाहिनीच्या’च्या हाती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ एप्रिल) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्ल्या प्रकरणी आता वेगवेगळे खुलासे होऊ लागले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव कोर्टाने या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे. तर इतर दोन आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे कोर्टात आज सुनावणी सुरु असताना विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या आधी रात्री अकरा ते अडीच वाजेदरम्यान सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर तीन जणांमध्ये मिटींग झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आता या प्रकरणातील मोठा खुलासा करणारं संभाषण ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागलं आहे.

Google Ad

सदावर्तेंच्या रिमांड कॉपीमध्ये सिल्व्हर ओक हल्ल्याआधी कशी अरेंजमेंट केली गेली त्याच्या फोन संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. तेच संभाषण ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागलं आहे. ‘सिल्व्हर ओक’वर हल्ल्याचा कट कसा रचला गेला? ‘सिल्व्हर ओक’वर कसा हल्ला केला गेला?

आणि काय घडलं ‘सिल्व्हर ओक’ हल्ल्या आधी? आंदोलनकर्त्यांची कशी जमावजमव केली गेली? याबाबत मोठा खुलासा करणारं संभाषण ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागलं आहे. हल्ल्याच्या काही मिनिटाआधीच अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि एक एसटी कर्मचारी संदीप गोडबोले यांचे फोनवर संभाषण होतं.

त्यांच्या संभाषणातून हल्ल्याबाबतची ओझरती माहिती समोर येत आहे.

अभिषेक पाटील : हॅल्लो !

संदीप गोडबोले : बोल अभिषेक अभिषेक पाटील : तिथेच जाऊ का?

संदीप गोडबोले : हा तिथेच जायचे अभिषेक पाटील : आम्ही बंगल्याच्या तिथे चपला सोडल्या.

आम्ही लवकर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आले. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब.

करावं तर सगळं आपणच करावं. बाकीचे निवांत बसावे. इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं. मुदलियार पाटील आताच आले.

आता रात्रभर मैदान आहे. सकाळी 9 पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का. संदीप गोडबोले : आता कुठे आहेत तुम्ही? अभिषेक पाटील : इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेकट.

त्यांना तिकीटना पैसे दिलेत. तिकीट काढलेत निघालेत. ७० ते ८० महिला आणि माणसं १०० -२०० संदीप गोडबोले : महालक्ष्मी पेट्रोल पम्प कुठे आहे विचारा अभिषेक पाटील : बरं पेट्रोल पम्पावर ना? मीडिया आली संदीप गोडबोले : मीडिया आली आहे अभिषेक पाटील : चला मिडीआ आली भाऊ संदीप गोडबोले : हो सरकारी वकिलांचे धक्कादायक खुलासे दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी आज कोर्टात गुणरत्न सदावर्ते यांच्याविषयी धक्कादायक खुलासे केले.

हल्ल्याच्या आधीच्या रात्री गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टॅरेसवर तीन जणांमध्ये मिटींग झाली. या मिटींगमध्ये सदावर्ते, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती, असा दावा वकिलांनी केला आहे. वकिलांनी कोर्टात आजही नागपूरच्या व्यक्तीचा उल्लेख केला. तसेच ती व्यक्ती सर्व आंदोलन हॅन्डल करत होती, असंही वकिलांनी सांगितलं.

पण वकिलांनी नागपूरच्या त्या व्यक्तीचं नाव आजही घेतलं नाही. त्यामुळे नागपूरच्या त्या व्यक्तीबद्दलचं गूढ आणखी वाढलं आहे. (गुणरत्न सदावर्तेंना झटका, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे) “गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टॅरेसवर 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते अडीच वाजेपर्यंत मिटींग झाली होती. यावेळी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती.

या प्रकरणी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार आहेत. जयश्री पाटील यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे”, असं सरकारी वकील प्रदिप घरत म्हणाले. “नागपूरची व्यक्ती मुंबईत होती. आंदोलनाच्या ठिकाणी होती, ज्या दिवशी आंदोलन झाले ते सर्व आंदोलन नागपूरची व्यक्ती हॅन्डल करत होती.

नागपूरच्या व्यक्तीने अभिषेक पाटील याला फोन केला आणि सिल्व्हर ओक जवळील गार्डनमध्ये लोकांना यायला सांगितले. नागपूरच्या व्यक्तीला अभिषेक पाटीलने नंतर फोन केला अणि लोकं गार्डनमध्ये जमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर नागपूरच्या व्यक्तीने मेसेज केला की, पत्रकारांना पाठवा. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे हल्ल्याआधी त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरा समोर भेटले”, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं.

आंदोलनकर्त्यांमधील 11 जण मद्य प्यायले होते. त्यांना मद्य कोणी पाजले याचा शोध घ्यायचा आहे.पोलिसांनी लक्ष्मी पेट्रोल पंप, सिल्व्हर ओक, सदावर्ते यांच्या घरचे आणि कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, अशी माहिती वकील प्रदिप घरत यांनी कोर्टात दिली. चंद्रकांत सुर्यवंशी याला पुण्यातून आणण्यात आले आहे. कलम 406 आणि 409 गुन्हे नव्याने दाखल केले आहेत.

आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा नव्याने दाखल करण्यात आला आहे. साक्षीदारांच्या जबाबातून मोठा खुलासा झाला आहे. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून छोटी रक्कम मुद्दाम घेतली. कारण त्याचा गाजावाजा होणार नाही.

यासाठी छोटी रक्कम जमा केली गेली. पण कर्मचाऱ्यांकडून जमा केलेली रक्कम आंदोलनाकरता खर्च केली गेली नाही. विशेष म्हणजे सदावर्तेंना बाहेरुन फंडींग मिळत होतं, असं प्रदिप घरत यांनी सांगितलं. तसेच 2 कोटी रुपये जमा झालेले.

ते पैसे जयश्री पाटील यांना देण्यात आले. पैसे कोणी दिले, कसे दिले, त्याचे काय करण्यात आले, याची सर्व नोंद एका वहीत केली गेली आहे. ती वही जप्त करायची आहे संबंधित प्रकरण हल्ल्यावरुन आता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळत आहे, असं तपासात समोर येत आहे, असंही प्रदीप घरत यांनी सांगितलं. “मी फी न घेता ही लोकसेवा करत आहे, असं सदावर्ते बोलत होते आणि मग जर पैसे गोळा केले हा कर्मचाऱ्यांचा विश्वासघात आहे. एक वकील म्हणून त्यांनी आपल्या अशिलांचा विश्वासघात केलाय’, असं सरकारी वकील प्रदिप घरत म्हणाले.

(सदर बातमी ‘न्यूज 18 लोकमत’ च्या वृत्तानुसार आहे.)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!