Google Ad
Editor Choice

Mumbai : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका … ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षांचे आहेत.

राज्य सरकारमधील एक धडाडीचा मंत्री आणि फर्डा वक्ता अशी धनंजय मुंडे यांची मुख्य ओळख आहे. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना कडवी झुंज देत यावेळच्या विधानसभेत परळी मतदारसंघातून विजयी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये धनंजय मुंडेंना पाहिलं जातं. या बातमीने राज्यात सध्या सर्वानाच धक्का बसला आहे.

Google Ad

🔴राजेश टोपे काय म्हणाले?
धनंजय मुंडे आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. डॉ. समधानी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी एमआरआय केले आहे. सर्व नॉर्मल आहे. माझ्या मते जे काही वायटल पॅरामीटर म्हणतो ते सर्व ठीक आहे आता, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच मी त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली, गप्पा मारतील. डॉक्टर समधानी उद्या सांगू शकतील. मात्र ते पूर्ण स्थिर आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही.

सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजेश टोपे यांनी डॉक्टरांशी, रुग्णालय प्रशासनाशी आणि धनंजय मुंडे यांच्या परिवाराशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!