महाराष्ट्र 14 न्यूज : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गुंडाळल्यावर विजयासाठी भारतासमोर ७० धावांचं माफक आव्हान होतं. सुरुवातीला दोन धक्के बसल्यावर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नवोदित शुभमन गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं. या विजयायामुळं कसोटी मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे.
पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, त्यामुळे रहाणेचा मुलाघ मेडल देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान, या विजयासह टीम इंडियाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असलेला रोहित शर्मा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

11 Comments