Google Ad
Editor Choice

Pune : पुण्यात भाजप-आरपीआयचे एवढे नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील … भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली भविष्यवाणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात भाजपचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा घौडदौड करेल.भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली.

“पुणेकरांच्या हिताचे निर्णय भाजपने घेतले. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 24 तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने 200 कोटींचा निधी दिला आहे. कोरोना संकट व्यवस्थितपणे हाताळलं. एकंदरित पुणेकरांना दिलेला शब्द पाळल्याने पुढच्या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त भाजप-आरपीआयचे नगरसेवक निवडणून येतील”, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

पुणे महापालिकेची निवडणूक 2022 ला होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासून तयारीला लागलेले दिसत आहे. पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांच्याकडून विविध विकासकामांची, उभा राहिलेल्या प्रकल्पांची तसंच अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची माहिती बापट यांनी घेतली. या बैठकीला खा. बापट, पुणे शहर भाजपाध्यक्ष जगदिश मुळिक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी नेते उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!