Google Ad
Editor Choice india

Mumbai : वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारी २०२१ मध्ये बँका राहणार १६ दिवस बंद … पहा, कोणत्या आहेत सुट्ट्या!

BANGKOK THAILAND - APRIL 22, 2015: Unidentified people visit Bangkok Bank. Bangkok Bank has over 1000 branches in Thailand with 26 international branches.

महाराष्ट्र 14 न्यूज : वर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारी २०२१ मध्ये तुमचे असे कोणते काम असेल, ज्याकरता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज भासणार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जानेवारीच्या नवीन महिन्यात बँकांना एकूण 16 दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये रविवार तसंच दुसरा-चौथा शनिवार, नॅशनल हॉलिडे पकडून एकूण 16 सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी बँक कधी बंद राहणार आणि कधी सुरू हे जाणून घेणे आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार या सुट्ट्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या असू शकतात. आरबीआय निर्देशांनुसार, बँका रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. आरबीआयच्या वेबसाईटनुसार, सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार ठरवल्या गेल्या आहेत. काही सुट्ट्या संपूर्ण देशभरातील बँकांसाठी लागू आहेत. तर काही राज्यांसाठी त्या राज्यानुसार, विशेष सुट्ट्या आहेत.

Google Ad

कुठे असणार 1 जानेवारीची सुट्टी?

नवीन वर्षात चेन्नई, ऐझाव्ल, गंगटोक, इंफाळ आणि शिलाँग याठिकाणी बँका बंद राहणार आहेत. शिवाय 1 जानेवारी भारतातील इतर ठिकाणी बँका सुरू असतील. ऐझाव्ल याठिकाणी 2 जानेवारीसाठी आणखी एक सुट्टी मिळेल.
एकूण 16 दिवस बंद राहणार बँका
1 जानेवारी 2021, शुक्रवार – नवीन वर्षाचा पहिला दिवस
2 जानेवारी 2021, शनिवार – न्यू ईयर सेलिब्रेशन हॉलिडे (ठराविक ठिकाणीच सुट्टी)
3 जानेवारी 2021, रविवार
9 जानेवारी 2021- दुसरा शनिवार

10 जानेवारी 2021- साप्ताहिक सुट्टी (रविवार)
12 जानेवारी 2021 – स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस (काही राज्यांमध्ये सुट्टी)
14 जानेवारी 2021 – मकर संक्रांत / पोंगल / माघ संक्रांत (काही राज्यांमध्ये सुट्टी)
15 जानेवारी 2021 – तिरुवल्लुवर दिवस / माघ बिहू आणि टुसू पूजा (काही राज्यांमध्ये सुट्टी)
16 जानेवारी 2021 – उझावर थिरुनल (काही राज्यांमध्ये सुट्टी)
17 जानेवारी 2021- रविवार
20 जानेवारी 2021 – गुरु गोविंद सिंह जी यांचा जन्मदिवस (काही राज्यांमध्ये सुट्टी)

23 जानेवारी 2021- चौथा शनिवार, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस
24 जानेवारी 2021- रविवार
25 जानेवारी 2021-इमोइनु इरपा (काही राज्यांमध्ये सुट्टी)
26 जानेवारी 2021- प्रजासत्ताक दिन
31 जानेवारी 2021- रविवार
RBI ने (Reserve Bank of india) वर्षभरातील सुट्ट्यांची जी लिस्ट जाहीर केली आहे त्यानुसार, 2021 मध्ये एकूण 56 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारची सुट्टीही आहे.बँकांच्या सुट्ट्यांबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India RBI) अधिकृत वेबसाइटवर जाऊन या संबंधात माहिती घेऊ शकता. दरम्यान या सुट्ट्यांच्या दिवशी एटीएम आणि मोबाइल app संबंधित कामे तुम्ही पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे ज्या बँकांमध्ये ऑनलाइन व्यवहार शक्य आहे, ते व्यवहार देखील चालू राहतील. बहुतांश बँका त्यांच्या ग्राहकांना 24 तास ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देतात.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!