Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : लसीकरणासाठी पुढाकार घ्या, अशिक्षित लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवा’ … या लोकांना मिळणार नाही लस : राजेश टोपे

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटमधून निघालेला कोरोना लसींचा साठा राज्यातील आठ प्रमुख डेपोंमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे. 15 तारखेच्या रात्रीपर्यंत या लसी ग्रामीण, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतील. त्यानंतर 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल.

Google Ad

लसीकरणासाठी पुढाकार घ्या, अशिक्षित लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवा’

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले.
राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रमक तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन आणि तिसऱ्या टप्प्यात व्याधी असणाऱ्या (को-मॉर्बिडिटी) असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

145 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!