Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pune

Pune : खडक पोलीस स्टेशन , पुणे शहर यांची कामगिरी … पिस्टल घेवुन फिरणा – या सराईत गुन्हेगारास अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दिनांक ११ जानेवारी २०२१ ) : खडक पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशनला हजर असतांना , पोलीस अंमलदार सागर केकाण व फईम सैय्यद यांना गुप्त बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की , खडक पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज इक्बाल पटवेकर हयाचे कंबरेला एक पिस्टल असुन तो छोटी मशिद शेजारील उसमानी रेस्टॉरन्टं गंज पेठ पुणे येथे बसलेला आहे . सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्रीहरी बहिरट खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांना सांगितली . त्यांनी योग्य ती काळजी घेवुन बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या .

त्यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अंमलदार यांचेसह बातमीच्या ठिकाणी उसमानी रेस्टॉरन्टं गंज पेठ पुणे येथे जावुन खात्री करता रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज पटवेकर हा पोलीसांना दिसुन आल्याने त्यास झडप घालुन पकडण्यात आले . परवेज पटवेकर यास पुर्ण नाव / पत्ता विचारता त्याने त्याचे नाव परवेज इक्बाल पटवेकर वय २३ वर्षे रा . २८० , गुरुवार पेठ , बोंबीलवाडा पुणे असे सांगितले , त्याची अंगझडती घेता त्याचे कंबरेस मागील बाजुस ३०,००० / रु किंमतीचे ०१ गावठी पिस्टल व २,००० / – रु किं चे ०२ जिवंत काडतुसे मिळुन आले असुन त्याचेवर खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचा तपास सुशिल वि बोबडे सहा पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत . अटक आरोपी याचे पुर्वीचे रेकॉर्ड पाहता त्याचेवर खुन , खंडणी , घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत .

Google Ad

नमुद कारवाई ही श्री . अभिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त पुणे शहर , डॉ . श्री संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , डॉ.प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री . गजानन टोम्पे , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री.श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री . सुशिल बोबडे , पोलीस अमंलदार अजिज बेग , फईम सय्यद , अनिकेत बाबर , गणेश सातपुते , संदिप पाटील , सागर केकाण , अमेय रसाळ , समीर माळवदकर , बंटी कांबळे , राहुल मोरे , रवी लोखंडे , योगेश जाधव , यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!