Google Ad
Agriculture News Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीत आठवडे बाजारास सुरुवात … सांगवीकरांना मिळणार थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र कृषी पणन महामंडळ, संत शिरोमणी श्री सावतामाळी अभियान, शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अंतर्गत आठवडे बाजार, या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड येथील सांगवी येथे आठवडे बाजार सुरू करण्यात आला. दर गुरुवारी पश्चिम भागात शितोळे नगर तर पूर्व भागात छावा चौक प्रियदर्शनी नगर येथे दर मंगळवारी हा आठवडे बाजार असणार असल्याचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या आठवडे बाजाराचे उद्धघाटन संजोग वाघेरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर व राजू मिसाळ विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रशांत शितोळे यांनी सांगितले कि शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला, कडधान्य, फळे आदि स्वयंपाक घरात लागणारे ताजे पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजीपाला विक्रेते व फेरीवाले यांचाही प्रश्न सत्ताधार्‍यांनी मार्गी लावावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त  केली.

Google Ad

या आठवडे बाजारामध्ये शेतीमधील ताजा सेंद्रिय भाजीपाला याचबरोबर गाईचे तूप, लोणी पनीर, खवा, खरवस, विविध प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे पापड, विविध प्रकारच्या चटण्या, चिवड्यांचे विविध प्रकार एकाच ठिकाणी व योग्य दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या आठवडे बाजारास मिळत आहे. यावेळी कुमार ढोरे, आबासाहेब ढमाले, शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, सुनिल ढोरे, उज्वला ढोरे, पंकज कांबळे, प्रकाश ढोरे, रुपेश पुजारी, राधिका घोडके, शेखर शितोळे, गणेश शितोळे, धनंजय शितोळे, कोमल कवडे, सविता पोरे, चंपाबेन रमेशभाई गोहेल, कस्तुरबेन परमार, सुनीता मोहिते, कस्तुरा काची जोत्सना चौहान, रिनल गोहेल आदि उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!