Google Ad
Editor Choice india Maharashtra

नवं शिक्षण धोरण रोजगारक्षम कौशल्य विकसित करणारे: कस्तुरीरंगन

महाराष्ट्र 14 न्यूज : एकविसावे शतक डोळ्यांसमोर ठेवून गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता रोजगारक्षम कौशल्य विकसित करणारं असं राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आहे, असं मत या धोरणाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले. पदवीपूर्व स्तरावर एक मल्टीडिसिप्लीनरी किंवा अधिक लवचीक शिक्षण, चार वर्षांची रचना असलेले माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कौशल्ये शिकण्याची संधी देणार आहे. या शिक्षणामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात, असे ते म्हणाले.

‘एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा भाग असणारं असं हे शिक्षण असेल. एकविसाव्या शतकाची गरज असलेली कौशल्यं आत्मसात करण्यासाठी जे शिक्षण लागणार ते मुलं शिकू शकतील. संवाद, कल्पकता, समस्या सोडवण्याची हातोटी आणि अशाच प्रकारचे अनेक गुण विद्यार्थ्यांच्या ठायी कसे येतील ते हे नवं शिक्षण धोरण पाहणार आहे,’ असं कस्तुरीरंगन एका मुलाखतीत म्हणाले. ‘शिक्षणाला योग्य मार्गावर आणणं, त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा आणि त्या-त्या क्षेत्रातील विकासाचा वापर करणं, संस्थांना बळकट करणं, ग्रॉस इनटेर रेशो वाढवणं आणि हे सर्व करत असतानाच शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करणं ही या नव्या धोरणाची उद्दिष्टं आहेत.’

Google Ad

चार वर्षे यूजी अभ्यासक्रम आणण्याच्या निर्णयाविषयी ते म्हणाले, ‘तरुणांना त्यांच्या त्यावेळच्या प्रगल्भतेच्या पातळीनुसार ज्ञानाधिष्ठित सर्वसमावेशक शिक्षण देणं जेणेकरून त्यांचे व्यावसायिक हित जपले जाईल, हा या चार वर्षांच्या अभ्यासक्रमांमागील उद्देश आहे. या प्रत्येक वर्षात शिक्षण पुढच्या टप्प्यावर नेण्याची क्षमता असेल. जर विद्यार्थ्याला एखाद्या टप्प्यावर थांबायचं असेल आणि दुसऱ्या व्यवसायात जायचं असेल तर त्याला तशी मुभाही असेल.’एम.फिल्.ची डिग्री रद्द करण्याच्या निर्णयाबाबत कस्तुरीरंगन बोलले, ‘एम.फिल. डिग्री मास्टर्सशी स्पर्धा करत नव्हती. जास्त चांगल्या पद्धतीने, गुणवत्तापूर्ण ज्ञानासह, एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी आवश्यक क्षमता अंगी येण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने पदवी घेण्याची आवश्यकता असते. आम्हाला वाटतं एम.फिल्. आज या क्षमतेवर उतरत नव्हती. म्हणून आम्ही त्या रचनेत बदल केला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!