Google Ad
Editor Choice Maharashtra Politics

भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंछ येथील ‘बॉर्डरच्या राजा’चा उत्सव यंदा वेगळ्या पद्धतीनं साजरा होणार आहे.

महाराष्ट्र 14 न्यूज : जसार्वजनिक मंडळांची गणेशमूर्तींची उंची ४ फुटांपर्यंत असावी, हा नियम भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंछ येथील ‘बॉर्डरच्या राजा’ला देखील लागू झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमांनुसार बॉर्डरच्या राजाची उंचीही दोन फूट इतकी असेल, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आल्याने सीमाभागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यंदा करोनामुळे पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र सर्व अडचणींवर मात करत आज, १ ऑगस्ट रोजी वांद्रेहून विशेष एक्स्प्रेसमधून ही मूर्ती पूंछच्या दिशेने रवाना होईल.

पूंछ येथील प्राचीन ‘शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट‘तर्फे गेली दहा वर्षे गणेशोत्सव साजरा केला जातो. सुरुवातीची काही वर्षे ही मूर्ती काश्मीरमध्येच घडवली जात होती. परंतु मागील तीन वर्षांपासून ही मूर्ती महाराष्ट्राच्या मातीतच घडायला हवी, असा विचार करून ट्रस्टच्या उपाध्यक्षा ईशर व सामाजिक कार्यकर्ते छत्रपती आवटे यांनी ही मूर्ती मुंबईहून नेण्याचे ठरवले. त्यानुसार सुरुवातीला मूर्तिकार उदय राणे तर मागील दोन वर्षांपासून विद्याविहार परिसरातील दिव्यांग मूर्तिकार विक्रांत पांढरे ‘बॉर्डरचा राजा’ घडवत आहेत.

Google Ad

यंदा करोनामुळे रेल्वेसेवा काही काळासाठी खंडीत करण्यात आल्याने गणरायाची मूर्ती पूंछपर्यंत कशी नेता येईल, असा प्रश्न आयोजकांना पडला होता. मात्र कुठल्याही परिस्थितीत ‘बॉर्डरच्या राजा’ची परंपरा खंडित होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्त्या ईशर यांनी ‘मटा’कडे बोलताना व्यक्त केला. यावर्षी करोनामुळे उद्धवलेली कठीण परिस्थिती लक्षात घेत मूर्तीचा आकार सातऐवजी दोन फूटपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच प्रवासात सुरक्षा निकषांचे काटेकोपणे पालन केले जाणार आहे. ही मूर्ती आज दुपारी वांद्रे येथून विशेष एक्स्प्रेसने जम्मू रेल्वे स्थानकापर्यंत नेली जाणार आहे. तेथून स्थानिक पोलिस प्रशासनाच्या सूचनांनुसार पूंछपर्यंतचा प्रवास पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. मूर्ती विद्याविहार येथून वांद्रे स्थानकाकडे नेण्यापूर्वी उपस्थितांना मास्कवाटप केले जाणार असल्याचे कळते आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!