Google Ad
Editor Choice

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पिंपळे गुरव मधील कोविड सेंटरला भेट … रुग्णांशी साधला संवाद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ एप्रिल) : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत अशी स्थिती निर्माण होते. रुग्णांना सेवा देण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सुद्धा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथे ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे कोविड सेंटर गुरूवारपासून (दि. २२) कार्यान्वित झाले आहे. या कोविड सेन्टरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. २५) रोजी भेट देऊन पाहणी केली व रुग्णांशी संवाद साधला, यावेळी त्यांच्या समवेत शहराच्या महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक सागर आंघोळकर, माऊली जगताप, डॉ. दिनेश फसके, मोरेश्वर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटी वेळी बोलताना ‘चंद्रकांत पाटील’ म्हणाले, “आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी नेहमीच झटत असतात. आता कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल शहरातील इतर सर्व राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण करणारे ठरेल.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शहरात विविध ठिकाणी जम्बो कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या मोठी असल्याने हे कोविड सेंटर कमी पडू लागली आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Google Ad

अशा परिस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप व त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या माध्यमातून पिंपळेगुरवमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आयुश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी, पिंपळेसौदागर या भागातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार मिळू शकेल.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!