Google Ad
Editor Choice Pune

१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देणार का ?, अजित पवार म्हणाले .

महाराष्ट्र 14 न्यूज : 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 मे पासून करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस देणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. यावर राज्यातील लस मोफत संदर्भात एक मे रोजी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारची भूमिका आहे की या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी तर सर्वच राज्य सरकारांची भूमिका आहे की केंद्र सरकारने जबाबदारी उचलावी. एकमेकांवर सोडून चालणार नाही. आम्ही या संदर्भात ग्लोबल टेंडर काढणार आहोत. यासाठी पाच जणांची कमिटी तयार केली आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

Google Ad

ग्लोबल टेंडर काढण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. यानंतर 1 मे रोजी मुख्यमंत्री मोफल लसीकरणाच्या संदर्भात आपली भूमिका आहे ती जाहीर करतील, असं अजित पवार म्हणाले.

सिरमचे अदर पुनवाला यांच्याशी लसींच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत. राज्य सरकारनेही लसीकरणाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा कसा होतो हे पाहावं लागेल. उज्वला गॅस सबसिडी योजनेप्रमाणे आम्हीही लसी संदर्भात नागरिकांना आवाहन करणार असून ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चाने लस घ्यावी, गरिबांना आम्ही लस देऊ, असं अजित पवार म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!