Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील ‘पिंपळे निलख’ येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र 14 न्यूज , ( दि.३१ जानेवारी  २०२१) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील ५ वर्षाखालील बालकांना प्रतिबंधक लस पाजण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे निळख दवाखाना या ठिकाणी दि.३१ जानेवारी २०२१ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत लहान बालकास पोलिओ डोस देऊन प्रकाश बालवडकर माजी (R.T.O.A.R.P.H.O) अधिकारी तसेच नगरसेवक तुषार कामठे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवी, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा डांगे, पिंपळे निलख दवाखाना प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री शेलार, सुकाळे सर, दीपक माकर, स्टाफनर्स वनिता माकर, भाग्यश्री भोसले, सागर कांबळे, गणेश काटे इत्यादीच्या उपस्थितीत करण्यात आला.

Google Ad

शहर पोलिओ मुक्त करण्यासाठी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून  पालकांनी आपल्या पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या पोलिओ बूथ केंद्रावर नेऊन पोलिओ डोस पाजून घ्यावा, पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महापालिकेने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.  शहरात १०१९ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.  या केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि ५५ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २१५ पर्यवेक्षक तसेच ३०४२ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

महापालिकेची सर्व रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा ९०८ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे असणार आहेत. तर बस स्थानक आणि रेल्वे स्थानक अशा ठिकाणी ३८ ट्रांझीट लसीकरण केंद्रे आणि वीटभट्टया, फिरत्या लोकांची पाले याठ ठिकाणच्या बालकांसाठी ७३ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे.

कोरोना विषाणू संक्रमण काळात नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यात ब-यापैकी यशस्वी झालो तरी अजून पूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करून आपल्या ५ वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचेही प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!