Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ८ रुग्णालयांत मिळणार कोविड-१९ लस … पहा, कुठे आणि कोणाला मिळणार लस!

महाराष्ट्र 14 न्यूज , ( दि .३१ जानेवारी २०२१ ) : केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१ ९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड मधील ०८ रुग्णालयांमध्ये कोविड -१ ९ लस आरोग्य सेवा देणा – या नोंदणीकृत डॉक्टर्स , अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येत आहे .

पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक संघटनांमधील सदस्य , इंडियन मेडिकल असोशिएशन ( IMA ) , नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन ( NIMA ) , पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन ( PCDA ) , दंततज्ञ संघटना , पॅथोलॉजिस्ट संघटना , नर्सेस असोशिएशन , फार्मासिस्ट असोशिएशन या संघटनाचे सदस्य असणा – या सर्व डॉक्टर्स तथा सर्व पॅरामेडिकल अधिकारी / कर्मचारी यांना दि .०१.०२.२०२१ रोजीपासून महानगरपालिकेच्या नेमून दिलेल्या ठिकाणी देण्यात येणार आहे.

Google Ad

🔴पिंपरी चिंचवड मधील या ठिकाणी मिळणार कोविड-१९ लस :-

यमुनानगर रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय , नवीन भोसरी रुग्णालय , वाय.सी.एम.रुग्णालय , पिंपळे निलख दवाखाना , कासारवाडी दवाखाना , तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या ०८ रुग्णालयामध्ये walk In पध्दतीने सकाळी ९ : ३० ते ४:०० या वेळेत उपस्थित राहुन कोविड -१ ९ लसीकरणाचा लाभ घेणेकरीता वैद्यकिय विभागामार्फत जाहीर आवाहन डॉ.पवन साळवे अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!