Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी ३१ जानेवारीला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी केले आहे.

मनपा परिसरात १०१९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ५५ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २१५ पर्यंवेक्षक व ३०४२ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, मनपा शिक्षक व उपशिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण १०१९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९०८ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३८ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ७३ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे.

मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. तरी आपल्या घरातील व आपल्या शेजारी राहणाऱ्या ५ वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण लसीकरण करुन घ्यावे, पालकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतर व मास्कचा वापरण्याची खबरदारी घ्यावी, असे महापौर व आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

या मोहिमेचे आयोजन आयुक्त हर्डीकर, महापौर ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!