Google Ad
Editor Choice Education

” संस्कृत ” ही पवित्र देवभाषा ” राजभाषा ” ( संपर्क भाषा ) म्हणून संपूर्ण भारतामध्ये स्वीकारण्यात यावी … गणेश बाबर यांचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जुलै) : नरेंद्र मोदी पंतप्रधान, भारत सरकार. व, अमित शहा केंद्रीय गृहमंत्री तथा राजभाषा मंत्री, भारत सरकार यांना “संस्कृत” ही पवित्र देवभाषा “राजभाषा” ( संपर्क भाषा) म्हणून संपूर्ण भारतामध्ये स्वीकारण्यात यावी. असे पत्र गणेश नामदेव बाबर सचिव कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पाठविले आहे.

या पत्रात गणेश बाबर यांनी म्हटले आहे की,संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. हीभाषा हिंदू  , बौद्ध ,आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

Google Ad

प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. पाणिनी पाकिस्तानचा, आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.

राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती… ‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, “अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राजभाषा, (संपर्क भाषा) व्हावी असे वाटे.

कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते,यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.ह्या भाषेत केवळ ‘।’ (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.

स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.
संस्कृत भाषेत एकेका देवाला अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णुसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही काही जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.

पुढील आगामी काळात संस्कृत भाषेच्या पुनरुत्थानाची सुरुवात करणे गरजेचे आहे , संस्कृत भाषेला गतवैभव परत मिळवून देण्याची आवश्यकता आहे. सध्या भारतातील नागरिक संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्‍न करत नाहीत, किंचितही स्तुति-प्रशंसाही करत नाहीत. तरी ही भाषा तळागाळात देशातील ग्रामीण भागात पोहोचण्याची आवश्यकता आहे . “संस्कृत” ही पवित्र देवभाषा “राजभाषा” ( संपर्क भाषा) म्हणून संपूर्ण भारतामध्ये स्वीकारण्यात यावी.

माननीय मंत्री महोदय , याबाबतचा प्रस्ताव आपण संसदेत मांडावा ही माझी देशाचा सुजान नागरिक म्हणून आपणास कळकळीची नम्र विनंती असेही गणेश नामदेव बाबर,
सचिव : कृषी ,पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना. यांनी म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!