Google Ad
Editor Choice Sports

सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष ‘चंद्रकांतदादा पाटील’ यांच्या उपस्थितीत रंगला … फायनलचा आमदार चषक क्रिकेट सामन्याचा थरार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ जानेवारी) : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फुल पिच टेनिस बॉल’ आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या समारोपाचा फायनलचा क्रिकेट सामना आज (रविवार दि.०९जानेवारी ) रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके आणि नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पीडब्लूडी मैदान नवी सांगवी येथे पार पडला.

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, यावर्षी दि. ३० डिसेंबर२०२१ ते ०९ जानेवारी २०२२ या कालावधीत या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शहरातील आणि शहरा बाहेरील नामांकित ९२ क्रिकेट संघांना या स्पर्धेत आमंत्रित करण्यात आले होते, प्रत्येक संघास मयुरचे टी-शर्ट देण्यात आले होते. ११ दिवस चाललेल्या या सामन्यात यावेळी डॉक्टर, महिला डॉक्टर, पोलिस, नगरसेवक यांच्यातील क्रिकेट सामनेही पाहायला मिळाले.

Google Ad

आज झालेल्या फायनलच्या क्रिकेट सामन्यातील खेळाडूंना प्रमुख पाहुणे चंद्रकांत पाटील आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजयी संघास रोख पारितोषिके आणि चषक व उत्तेजनार्थ वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. आयोजकांनी सामन्यांचे अगदी चांगल्या प्रकारचे आयोजन केल्याचे तसेच त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने क्रीडा रसिकांनी या आनंदाच्या पर्वणीचा पुरेपूर आनंद घेतल्याचे यावेळी पहायला मिळाले.

▶️ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत असे होते विजयी संघ :-

*🏏पुणे जिल्हा टेनिस बाॅल क्रिकेट असोशियशन अंतर्गत ३ लोकल हाफ १ ओपन हाफ विजयी संघ🎾*

*🥇प्रथम पारितोषिक : धनविन स्पोर्ट क्लब, अलिबाग रु. 71,000/- व आमदार चषक*
*🥈द्वितीय पारितोषिक : संदीप दहीभाते क्रिकेट क्लब 51,000/- व आमदार चषक*
*🥉तृतीय पारितोषिक :- छत्रपती शिवाजी मराठा इलेव्हन 31,000/- व आमदार चषक*
*🏅चतुर्थ पारितोषिक : प्रशांत म्हसळकर 15,000/- व आमदार चषक*

▶️🏏पिंपरी चिंचवड हाफ व सांगवी- पिंपळे गुरव हाफ विजयी संघ

🥇प्रथम पारितोषिक : क्लब 69 सांगवी 51,000/- व आमदार चषक आणि रु. २१०००/- उन्नती सोशेल फौंडेशन
🥈द्वितीय पारितोषिक : रावेत क्रिकेट क्लब, रावेत 31,000/- व आमदार चषक
🥉तृतीय क्रमांक :- जय गणेश क्रिकेट क्लब, सांगवी 21,000/- व आमदार चषक
🏅चतुर्थ क्रमांक :- संडे क्रिकेट क्लब, कासारवाडी 11,000/- व आमदार चषक

▶️🏏पुणे जिल्हातील 40+ दोन हाफ🎾 विजयी संघ*

🥇प्रथम पारितोषिक : रमेश सपकाळ संघ 31,000/- व आमदार चषक
🥈व्दितीय पारितोषिक : सुकाई प्रतिष्ठान, सांगवी 15,000/- व चषक

आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://Www.criclife.in  अजयदादा दुधभाते,दिपक मंडले सर,प्रदिप गुळमिरे यांनी केले तर क्रिकेट सामन्यांचे समालोचन प्रशांत आदवडे , उत्तम सावंत, प्रवीण गायकवाड या सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले आहे,त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला. या आयोजनात मा. शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अजय दुधभाते, निलेश जगताप, मनीष कुलकर्णी तसेच किरण दहिवाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दिसून येत होते.

आजच्या सामन्याची काही क्षणचित्रे :-

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!