Google Ad
Editor Choice Education

शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पिंपरी चिंचवड शहरात डंका … विद्यार्थ्यांच्या पाठीवर आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी दिली कौतुकाची थाप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०८ जानेवारी) : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ निकाल जाहीर झाला असून पिंपरी चिंचवड शहरातून पाचवीमधून महापालिकेच्या पिंपळे गुरव प्राथमिक शाळेमधून मृणाली प्रमोद सकपाळ या विद्यार्थिनीने ८८.६६ टक्के गुण प्राप्त करत मनपा शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे . तर नैतिक रवी ठाकरे हिने ८३.३३ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे . शाळेचे वर्ग शिक्षक — श्री. सचिन वैद्य, मुख्याध्यापक- श्रीमती. साधना वाघमारे, पर्यवेक्षक-श्री. रामदास लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करून त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच नगरसेविका उषाताई मुंढे, नगरसेवक सागर अंगोळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून पाचवी आणि आठवीचे असे एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील पाचवीच्या वर्गामधून ३ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार २०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८६५ विद्यार्थी पात्र ठरले तर १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

इयत्ता८ वी च्या वर्गांमधून ३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले. त्यातून १ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. राहटणी येथील कन्या शाळा क्रमांक ५५ मधील संजना राजेंद्र मांगवडे हिने ७८ टक्‍के गुण मिळवित महापालिकाशाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मोशी कन्या प्राथमिक शाळेतील नंदिनी रमेश भालेकर हिने ७०.६६द्वितीय क्रमांक मिळविला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!