Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथील पुरातन काळातील तुळजाभवानी मंदिराचे नूतनीकरण … नवरात्र उत्सवात मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० सप्टेंबर) : पिंपळे गुरव येथील पुरातन काळातील तुळजाभवानी मंदिराचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी मात्र नूतनिकरणामुळे मंदिराचा संपूर्ण कायापालट झालेला पहावयास मिळत आहे. बाहेरून काळ्याभोर दगडांपासून घडविलेले मंदिर व सीमा भिंत, मंदिरात भिंतींवर ग्रॅनाईट फरशीचा वापर आदींनी सुसज्ज असे मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

मंदिरातील प्रवेशद्वारावर असणारे देवीचे वाहन सिंह तसेच दगडांपासून घडवून नव्याने उभारण्यात आलेली दीपमाळ लक्षवेधी ठरत आहे. मंदिरावर भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. मंदिरावरील सोनेरी कळस त्यावर सोडण्यात आलेली विद्युत रोषणाई रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करीत आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर सभोवताली भव्य मंडप टाकण्यात आला आहे. त्यावर रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या माळा सोडण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सायंकाळच्या सुमारास लख्ख प्रकाश पडत आहे.

Google Ad

पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान मानले जात आहे. नवरात्र उत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करीत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष साधेपणाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र मंदिराचे विश्वस्त कदम परिवार नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज आहे. येथील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही परंपरेनुसार देवीची विधिवत पूजा, देवीची सजावट, नऊ दिवसांची नऊ रूपे साकारण्यात येत आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे. देवीला गजरे, वेणी, श्रुंगाराने सजविण्यात येत आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवात देवीची मनमोहक मूर्तीचे रूप पहावयास मिळत आहे. अष्टमीला होमहवन, दसऱ्याच्या दिवशी गाव प्रदक्षिणा, कोजागिरीला महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो. अशी माहिती मंदिराचे पुजारी सुरेश कदम, स्वप्नील कदम व कदम परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!