महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३०नवरात्र निमित्त पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमीच्या वतीने सालाबाद प्रमाणे पंधरा दिवसाचे दांडिया प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या दांडिया प्रशिक्षण कार्यशाळे मध्ये 117 महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता या कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी त्यातील पाच उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्याना पारितोषिक देण्यात आले. 1) रूपा सागर जाधव 2)अवंतिका लक्ष्मण डोंगरे 3)विराज जितेंद्र मेहता 4)प्रिया राव 5)नंदा रुपेश कोटारीयांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तर त्याच्या बरोबर आणखीन पाच स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे व सिनेअभिनेत्री ऋतुजा अंधेरीइ यांच्या हस्ते मेडल व सन्मान पत्र देऊ या सर्वांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनी सांगितले की ही स्पर्धा पुढच्या वर्षी हजारोंच्या मोठ्या संकेत साजरी करण्यात येणार आहे यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहणार आहोत. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पंकज सोहनी सर यांनी केले तर आभार राजू आवळेकर यांनी मानले.