Google Ad
Editor Choice

पिंपळे निलख दवाखाना अंतर्गत “माता, सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियांनांतर्गत महिलांच्या करीता या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ सप्टेंबर) : मा . मंत्री , सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण , महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार , राज्यात व जिल्ह्यातील १८ वर्ष वयोगटावरील सर्व महिला , माता , गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणीसाठी दि . २६ सप्टेंबर , २०२२ रोजी पासून नवरात्र उत्सवात ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे निलख दवाखाना अंतर्गत “माता, सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियांनांतर्गत, या निमित्ताने नवरात्रोत्सवात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील युवती , गरोदर महिला मातांची तपासणी करण्यात येणार आहे . ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अशी संकल्पना घेऊन विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत :-

Google Ad

1) दि 30/09/2022 रोजी सकाळी 9ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात येणार आहे यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे तसेच सकाळी 10.30 वाजता महिलांना त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्या विषयीं सौं जयश्री मुरुडकर यशदा मधील (माजी क्लास 1 अधिकारी ) मार्गदर्शन करणार आहे

1) दि 03/10/2022 रोजी बुद्धविहार पिंपळे निलख गावठाण येथे सर्व रोगनिदान शिबीर व T3 camp सकाळी 09 ते 02 या वेळात आयोजित करण्यात आले आहे.

3) दि 04/10/2023 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळात डॉक्टर किशोरी माने या गर्भसंस्कार विषयी माहिती देणार आहे. व 11ते 12 या वेळात पिंपळे निलख अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या द्वारे लहान मुलांचे नियमित लसीकरण, गरोदर माता नोंदणी, व पोषण आहार या विषयी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

तरी सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जयश्री देविदास शेलार प्रभारी वैद्यकीय अधिकारी पिंपळे निलख दवाखाना यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!