Google Ad
Editor Choice

येत्या काही दिवसांत कामगार आयुक्तांकडून माथाडी कामगार भरती – त्रिगुण कुलकर्णी..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ ऑक्टोबर २०२१) : रेशन दुकानदारांनी आपल्या कार्यालयात रंगरंगोटी, स्वच्छता आणि दप्तर अद्ययावत ठेवावे. प्राधिकारपत्र वेळेत नूतनीकरण करून घ्यावीत. एनसीआरबाबत कार्डधारकांना सूचना द्याव्यात. केरोसिन परवाना नूतनीकरण करून घ्यावा. रेशन दुकानदारांना धान्यवाटपाचे कमिशन त्वरित वाटप करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व दुकाने आयएसओ मानांकित करण्यात येणार आहेत. त्याबाबत लवकरच प्रणाली जाहीर केली जाईल, समाजाच्या प्रत्येक घटकाला चांगली सेवा देणे, त्यांना वेळच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या कामास नेहमीच प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन अन्न आणि नागरी पुरवठा, पुणे विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी केले.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदारांची बुधवारी (दि. २७) रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपयुक्त कुलकर्णी बोलत होते. बैठकीस गंगाखेडचे ना. तहसीलदार तथा आयएसओ अधिकारी संतोष सरडे, पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, पिंपरी चिंचवड ‘अ व ज’ शिधावाटप परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी तथा नायब तहसिलदार दिनेश तावरे, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता, धर्मा तंतरपाळे, तहसिलदार, सर्व परिमंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक, लिपिक, अन्न आणि नागरी पुरवठा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच डीएसओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील सर्व नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून, कारकुन, लिपिक तसेच रेशन दुकानदार, जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Google Ad

उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग समाजातील गरीब आणि सर्वसामान्यांशी निगडीत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजासह अन्नधान्य वितरण कार्यालयं आणि जिल्हा पुरवठा कार्यालयं कात टाकत आहेत. आधुनिकीकरणाची गतिमानता आणि पारदर्शकता हा अमुलाग्र बदल स्वागताहार्य आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तहसिल कार्यालये कोऱ्या रेशनकार्डची मागणी अथवा पुरवठा करीत नाहीत. त्यामुळे तालुकास्तरावर ग्राहक पुरवठा कार्यालयात ये-जा करीत असतात, ते थांबवा. येत्या पंधरा दिवसांत कामगार आयुक्तांकडून माथाडी कामगार भरती केली जाईल. दिवाळीपूर्वी सर्व हमालांचे बिलं अदा करावीत अन्यथा मी स्वतः कार्यालयात येऊन आढवा घेईल, अशी तंबीही त्यांनी दिली.

असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, सेतु व महा-ई-सेवेतुन संबधित पुरवठा कार्यालयांकडे नविन शिधापत्रिका, युनिट कमी-वाढ, दुबार, विभक्त प्रकरणे वेळीच निकालात काढावीत. आमच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या सोडविण्यावर भर द्यावा. बैठकीत अधिकाऱ्यांनी केलेल्या स्वच्छताविषयक आणि आयएसओ बाबतच्या सूचनांचे देखील आम्ही पालन करू. कार्डधारकांना ऑनलाइन आणि अद्ययावत कार्ड त्वरित द्यावे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे संबधित पुरवठा निरिक्षकांनी रेशन दुकानदार व शिधापत्रिकाधारकांना वेळेत धान्य देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

धर्मा तंतरपाळे यांनीही दुकानदारांच्या समस्या बैठकीत मांडल्या.

———————

अधिक माहितीसाठी
मा. विजय गुप्ता………
शिवसेना – पिंपरी विधानसभा समन्वयक,
खजिनदार – ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स असोसिएशन
मोबाईल क्रमांक : +91 98224 48519. 
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!