Google Ad
Editor Choice

नवी-सांगवी मधील सामाजिक कार्यकर्ते ‘सोमनाथ फसके’ यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन फसके यांचे वडील कै. सोमनाथ आप्पाराव फसके (वय ६५ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (२८ ऑक्टोबर ) रात्री ७ .३० वा. च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सोमनाथ फसके यांच्या निधनाची माहिती कळताच नवी-सांगवी -पिंपळे गुरव परिसरात शोककळा पसरली, मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील सुंभ टाकळी गावचे असलेले सोमनाथ फसके त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-सून,मुली-जावई, भाऊ – वहिनी पुतणे असा मोठा परिवार आहे.

सांगवी, नवी सांगवीतील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात तसेच अहिल्यादेवी होळकर सेवा संघात ‘सोमनाथ फसके’ यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची गावात ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad

टीप :- अंत्यविधी शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा. पिंपळे गुरव स्मशान भूमी येथे होईल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

35 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!