Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीला येणार बळकटी … शहर चिटणीसपदी शिरीष साठे यांची निवड!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि. २७ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक फेब्रुवारी २०२२ होत आहे, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच शरद पवारांना शहरात आणून वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. आणि आता पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील शिरीष साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर चिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली . शहराध्यक्ष संजोग वाघेरे , माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ( नाना ) काटे , प्रशांत शितोळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र पत्र देण्यात आले .

पिंपळे निलख येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान व शिरीषसाठे युवा मंचाच्या माध्यमातून पिंपळे निलख येथे शिरीष साठे सामाजिक कार्यात गेली अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामात त्यांचे मोठे योगदान राहिले असून , आगामी काळात संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या अनुभवाचे पक्षाला योगदान मिळेल , असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!