Google Ad
Editor Choice

Pune : प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांचा पहिलाच दणका … अशी, होणार कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज प्रशासकपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून विद्रुपीकरणात भर घालणार्‍या अनधिकृत व्यावसायीकांना दणका दिला आहे.

पदपथ आणि इमारतींच्या ओपन स्पेसवर सुरू असलेले बेकायदा व्यवसाय आणि अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता या आदेशामुळे मात्र शहरात अतिक्रमण कारवाई जोरात होणार, हे नक्की मानले जात आहे. कारण यापूर्वी कारवाई करताना नगरसेवक मध्यस्थी करायचे. मात्र आता नगरसेवकांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे प्रशासनाला आता मोकळीक मिळाली आहे.

Google Ad

महापालिकेच्या नगरसेवकांची सोमवारी (दि.१४ मार्च) मुदत संपली आहे. आजपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे कामकाज पाहाणार आहेत. पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी शहरातील रस्ते आणि मोकळे करण्यास प्राधान्य दिले आहेत. पदपथ, रस्त्यांच्या कडेला आणि इमारतींच्या साईड, फ्रंट मार्जीनमध्ये सुरू असलेले पथारी व्यवसाय, हॉटेल्स व अन्य व्यवसाय तातडीने बंद करावेत.

तसेच यासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते मंडप, स्ट्रक्सर्च संबधित व्यावसायीकांनी काढून घ्यावेत, असे आदेश दिले आहेत. यानंतरही बेकायदा व्यावसायीक आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!