Google Ad
Editor Choice

बीएचआर मधील १२ आरोपींकडून ४९ कोटी जप्त होणार … पोलीसांकडून फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल न्यायालयात सादर … ठेवीदारांना मिळणार पैसे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : भाईचंद हिराचंद रायसाेनी मल्टीस्टेट काे-ऑपरेटिव्ह साेसायटी (बीएचआर) घाेटाळयात कारवाईत करण्यात आलेल्या १२ आराेपींचा फाॅरेन्सिक ऑडिट रिपाेर्ट पुणे आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाला आहे. सदर अहवाल पाेलीसांनी साेमवारी विशेष सत्र न्यायाधीश एस.एस.गाेसावी यांच्या न्यायालयात सादर करत १२ आराेपींकडून एकूण ४९ काेटी १५ लाख रुपये जप्त करावयाचे असल्याचे सांगितले आहे.

फाॅरेन्सिक ऑडिट अहवालानुसार औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या अंबादास आबाजी मानकापे यांच्याकडून सर्वाधिक ३५ काेटी रुपये जप्त करावयाचे आहे. तर उर्वरित रक्कम आराेपी जयश्री मणियार, जयश्री अंतिम ताेतला (रा.मुंबई), संजय ताेतला(रा.जळगाव),दालमिल असाेसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण काेगटा,भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार चंदूभाई पटेल, जितेंद्र पाटील (जामनेर) ,जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झालटे,जळगाव येथील सराफ आणि हाॅटेल व्यवसायिक भागवत भाेंगाळे, प्रतिश जैन(धुळे), कापूस व्यापारी राजेश लाेढा,भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आस्तीक तेली यांच्याकडून जप्त केली जाणार आहे.

Google Ad

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास मानकापे यांनी बीएचआरकडून सुरुवातीला कर्ज घेतले हाेते परंतु आठ काेटींचे थकीत कर्ज असूनही त्याचा भरणा केला नाही. त्यानंतर मुदत ठेवी जुळवताना दाेन काेटी ७१ लाख रुपयांचे कर्ज घेतले गेले परंतु त्याचा ही भरणा नंतरच्या काळात करण्यात आला नाही. अशाप्रकारे सदर रक्कमांवरील चक्रवाढ व्याजदराने वाढत गेलेली रक्कम ३५ काेटींच्या घरात पाेहचली आहे. आतापर्यंत बीएचआरचा ११०० काेटी पेक्षा अधिक रुपयांचा घाेटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

बीएचआर पतसंस्थेतील फसवणुक व अपहार प्रकरणी पुणे पाेलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जुलै २०२१ मध्ये एकाचवेळी जळगाव, जामनेर, भुसावळ, औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकाेला,पुणे आदी ठिकाणी छापेमारी करत १२ आराेपींना अटक केलेली हाेती. याप्रकरणातील मुख्य आराेपी सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंदारे यांनाही यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सहपाेलीस आयुक्त डाॅ.रविंद्र शिसवे, अपर पाेलीस आयुक्त रामनाथ पाेकळे, आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटक्के यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक सुचेता खाेकले करत आहे.

ठेवीदारांना परताव्याबाबत आवाहन :

बीएचआर च्या सर्व ठेवीदारांच्या सोयीसाठी संस्थेचा एक मोबाईल नं . ९०२२९८०५८९ देण्यात आला आहे. सर्व ठेवीदारांनी त्यांच्या अडचणी WhatsApp द्वारे वरील नंबरवर कळवाव्यात , तसेच वेळोवेळी ठेवीवाटपाबाबत जे नियोजन करण्यात येईल ते आपणांस संस्थेच्या वेबसाईट वर ( www.bhronline.in ) उपलब्ध राहील याची नोंद घ्यावी .  असे आवाहन  चैतन्य नासरे (अवसायक) यांनी केले आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!