Google Ad
Editor Choice Education

पिंपरी चिंचवड मनपात होणाऱ्या आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखती अचानक रद्द झाल्याने परीक्षार्थींना मोठा भुर्दंड आणि मनस्ताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मार्च) : पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) या रिक्त पदासांठी ०७ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार १६ व १७ मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

Google Ad

काल (दि.१५ मार्च) दुपारी परीक्षा रद्द करण्याची मान्यता मिळाल्या नंतर लागलीच प्रेसनोट आणि तसे निवेदन महापालिका संकेतस्थळावर टाकण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी परीक्षा तेथे एक बोर्ड लावून परीक्षा रद्द झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली.

दरम्यान, ही परीक्षा अचानक रद्द झाल्याचे परीक्षार्थींना माहिती नव्हते. यामुळे राज्यातील विविध भागातून लांबच्या ठिकाणाहून परीक्षार्थीं आज (बुधवार) सकाळीच महापालिका भवन परिसरात जमा झाले होते. अचानक परीक्षा रद्द केल्याने या परीक्षार्थींना त्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या गलथान कारभाराचा या परीक्षार्थींना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागल्याचे आज झालेल्या गर्दीवरून दिसून आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!