Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यात राज्यसरकार विरोधात मराठा समन्वय समितीचं आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात मराठी समव्यय समितीचं महाविकासआघाडी सरकारविरोधात जागरण गोंधळ आंदोलन सुरु आहे . विनायक मेटेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे . बालगंधर्व चौकात हे आंदोलन होत आहे . या आंदोलनात राज्यातील अनेक मराठा संघटना सहभागी झाले आहेत . राज्य सरकार मराठा आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून कोणतीही तयारी करत नाही . या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत .

त्यांना या समितीमधून हटवा आणि मराठा आरक्षण वाचवा अशी हाक देण्यासाठी आजचं आंदोलन सुरु असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे . विनायक मेटेंनी म्हटलं की , राज्यात आता सरकारच्या विरोधात असेच जागरण गोंधळ आंदोलन केले जाईल . महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा विर धात हे आंदोलन आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता कार्यक्षम मंत्री द्यावा . एकनाथ शिंदेच नाही तर दुसऱ्या समाजाची जाण असलेला मंत्री दिला तरी चालेल.असं ही मेटेंनी म्हटलं आहे.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!