Google Ad
Editor Choice Food & Drinks Health & Fitness india

दररोज घराबाहेर जाणं गरजेचं ? मग आठवणीने करा ३ कामे

महाराष्ट्र 14 न्यूज : दैनंदिन जीवनातील आवश्यक सामना खरेदी करण्यासाठी किंवा प्रत्येक दिवशी ऑफिसला जाताना तुम्ही आठवणीने मास्कचा (Face Mask) वापर करत असणार, यात शंका नाही. तसंच हँड सॅनिटायझरही सोबत ठेवत असाल. करोना व्हायरसच्या संसर्गापासून (Coronavirus) स्वतःचा बचाव करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही काटेकोरपणे पालन करावे. दरम्यान, अद्याप करोनाचा (Covid 19 Update) धोका कमी झालेला नाही.

अजूनही काही जण गरम पाणी पिण्याचा कंटाळा करतात. पण घराबाहेर असताना स्वतःसोबत गरम पाणीची बाटली न्यावी. तसंच घरी आल्यानंतरही गरमच पाणी प्यावे. कारण सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना किंवा एखाद्या गर्दीची ठिकाणी असताना, तुम्ही करोना व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गरम पाणी पिणे गरजेचं आहे. गरम पाण्यामुळे करोनाला दूर ठेवण्यास तुम्हाला मदत मिळते.- दिवसभरात तुम्ही किती प्रमाणात पाणी पिता, ही बाब देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही निरोगी आरोग्याच्या आवश्यकतेनुसार पाणी पित आहात तर हा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये जास्त काळ जिवंत राहणार नाही.

Google Ad

– रशियातील आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिवसभरात तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलात तर शरीरात प्रवेश करणाऱ्या करोना व्हायरसचा २४ तासांच्या आतमध्ये ९३ टक्क्यांपर्यत खात्मा होण्यास मदत मिळते. ही माहिती एका संशोधनाद्वारे समोर आलेली आहे.साधारणतः उन्हाळ्यामध्ये दूध कमी प्रमाणात प्यावे, असा सल्ला दिला जातो. पण सर्दी, खोकला, कफची समस्या दूर करण्यासाठी हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये हळदीचे दूध पिणे आरोग्यास लाभदायक ठरेल. आयुष मंत्रालयानेही आहारामध्ये हळदीच्या दुधाचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळा आणि करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावामध्ये आरोग्य जपण्यासाठी नियमित हळद मिक्स करून गरम दूध प्यावे.

करोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी नियमित ग्लासभर हळदीचे दूध पिण्याची सवय लावून घ्यावी. या दुधास ‘गोल्डन मिल्क’ असेही म्हटलं जाते. शरीरात प्रवेश केलेल्या करोना व्हायरसचा हळदीयुक्त दुधामुळे खात्मा होण्यास मदत मिळू शकते. सोबत व्हायरसमुळे शरीराचे झालेले अन्य नुकसान भरून काढण्यासाठीही हळदीचे दूध भरपूर फायदेशीर आहे.करोना व्हायरसमुळे फुफ्फुसांना आलेली सूज, घशामध्ये खवखव होणे, खोकला, छाती जड होणे, डोकेदुखी, शारीरिक थकवा, इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळते. नियमित स्वरुपात दोन वेळा हळदीचे दूध प्यावे. स्वतःचा तसंच आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी योग्य ती खबरदारी बाळगावी.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!